प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म २० जुलै पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा


प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म २० जुलै पासून सुरू

स्वेरीकडून विविध ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा




पंढरपूरः 'प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे (कॅप राउंड-१) ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२० जुलै २०२३ पासून  सुरु होत असून ती शनिवार दि. २२ जुलै पर्यंत चालणार आहे. या पहिल्या कॅप राउंड मधून विद्यार्थी हवे ते महाविद्यालय आणि पसंतीची शाखा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय आणि  शाखा निवडण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील प्लेसमेंट, वार्षिक परीक्षांचे  निकाल, प्रत्येक वर्षी होणारी विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, वसतिगृह सुविधा, इतर सोयी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, मिळालेली मानांकने, विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारे  संशोधनाचे वातावरण या सर्व बाबी प्रामुख्याने पहाव्यात आणि मगच महाविद्यालय निवडावे. 'विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत महाविद्यालयांची नावे काळजीपूर्वक भरणे आवश्यक असते. पालक व विद्यार्थ्यांचा नाहक प्रवास खर्च व वेळ वाचावा तसेच विद्यार्थी व पालकांना अचूक पद्धतीने हे फॉर्म्स भरता यावेत या हेतूने स्वेरीच्या वतीने विविध ठिकाणी मोफत फॉर्म भरण्यासाठी सेंटर स्थापित करण्यात आलेली आहेत. त्या सेंटर्स चा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

            शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राऊंड-१चे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.२० जुलै २०२३ पासून ते शनिवार दि. २२ जुलै, २०२३ पर्यंत   चालणार आहे. स्वेरी अभियांत्रिकीचा इन्स्टिट्यूट चॉईस कोड इ. एन.-६२२० हा आहे. विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सांगोला (आर.बी.पवार-९६६५२२७५८५, व्ही.एम.साळे- ९१७५७९९४८०), बार्शी (पी.बी.भागानगरे- ९७६६२२३५२२, एस.एस.गायकवाड -८९७२८०००७८), कुर्डुवाडी (एस.सी.हलकुडे- ९८५०२४२१५५, एम. एम. आवताडे- ८३२९३९०८१७), धाराशिव (ए.ए.गरड-९२८४७०६०२७, एस.ए.गरड-८२०८६२०७१८), लोहारा(ए.ए.शिंदे-८६६८४१६५५९, जे.एल.मुसळे– ९३५९२५०५१३), वैराग (एच. आर. पवार ८२०८४४८५९२), करमाळा (बी. टी. गडदे- ८२०८२६२११३, पी.डी.माने-७०२०६०६७७९), माढा (डी.टी.काशीद – ८२०८७२४२६६, ए. के पारखे-९५०३६३२६२२), टेंभुर्णी (एम.एस. सुरवसे-८८०६६६०५३७, एस.डी.इंदलकर-९६६५६४०६४२), मंगळवेढा (पी.बी.आसबे–७८२१००४६४७, के.एस.पुकाळे -७७७६०७०९१३), अकलूज (सी.सी.जाधव– ८३०८६८९५७०, वाय. बी. सुरवसे- ८६००८५५०२३), अक्कलकोट (जे. के. कोष्टी-९५८८४९२१२०, एस.डी.कोल्हे- ९७६७१३२८४८), जत (एस. एम. शिंदे-९४०३७५१०३९, एच.एच. मल्लाड- ९९७५६२३८७५), महूद (व्ही.ए.सावंत-७७०९३२२०७३, व्ही.व्ही.राजमाने- ९०६७२८७७६७), करकंब (एस. जी. जाधव-९७६४३५४८०९, एस. एम. काळे-९९६०११८५८०), मोहोळ (आर. एस. साठे– ७७०९९४१४८२, पी. पी. चव्हाण -८४४६४०४६०९), आटपाडी (ए.बी. कोकरे– ९७६६१२९१६९), उ. सोलापूर (ए. एस.ढवळे -८३८००५०५६०)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने तसेच अभियांत्रिकीला सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर या पहिल्या कॅप राउंडला देखील नेहमीप्रमाणे विक्रमी गर्दी होणार, हे निश्चित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad