पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांना "उमास प्रा. लिमिटेड" कंपनीकडून वार्षिक साडे चार लाखाचे पॅकेज*

 *पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांना "उमास प्रा. लिमिटेड" कंपनीकडून वार्षिक साडे चार लाखाचे पॅकेज*




पंढरपूर: प्रतिनिधी


उमास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग क्षेत्रात कार्यरत असून, मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत सेवा प्रदान करते. ही कंपनी मोस्ट नावाच्या सॉफ्टवेअर द्वारे, मनुष्यबळ योग्य प्रकारे वापरून कंपनीचे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करते. या कंपनीचे मालक हे पंढरपूर वासी अशोक बडवे आहेत. या कंपनीची वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये पेक्षा जास्त असुन हि कंपनी परदेशातील श्रीलंका, भूतान, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशात सेवा प्रदान करत आहे. अशा या कंपनीत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अशिश सतीश बनकर, सत्यजित मुळे आणि तेजस कुलकर्णी या ३ विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन "उमास प्रा. लिमिटेड" कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४.५० लाख रूपये वार्षिक पगार मिळणार आहे.

     "उमास प्रा. लिमिटेड" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad