*पंढरपूर सिंहगडच्या करण सुतकर ची एकाच वेळी टॅक्स असिस्टंट सह मंञालयात क्लर्क पदी निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शैक्षणिक वर्ष २०१५ मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केलेले सौंदणे (ता. मोहोळ) येथील करण सुतकर यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाच वेळी टॅक्स असिस्टंट सह मंञालयात क्लर्क पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांञिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा संदर्भात नामांकित व्याख्याते यांचे मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध असुन या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करत आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून २०२१ साली टॅक्स असिस्टंट सह मंञालयात क्लर्क पदाची भरती संबंधित जाहिरात देण्यात आली. टॅक्स असिस्टंट आणि मंञालयात क्लर्क पदाच्या दोन्ही परीक्षा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या करण सुतकर यांनी दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षेत करण सुतकर यांनी घवघवीत यश संपादन केले असुन टॅक्स असिस्टंट पदाच्या परीक्षेत एस. सी. कॅटेगरी मधुन तो राज्यात तिसरा क्रमांक मिळवून यशस्वी झाला आहे.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये देण्यात येत असलेल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे तसेच अचूक मार्गदर्शनामुळे मि आज स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठू शकलो. टॅक्स असिस्टंट पदाची नोकरी जाॅईन करणार असल्याचे करण सुतकर यांनी पञकाराशी बोलताना सांगितले.
स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.