स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची 'सँकी सोल्युशन्स' कंपनीत निवड वार्षिक रु. ४ लाख इतक्या पॅकेजची मिळाली ऑफर

                                                                                         

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची 'सँकी सोल्युशन्स' कंपनीत निवड

वार्षिक रु. ४ लाख इतक्या पॅकेजची मिळाली ऑफर



पंढरपूरः- ‘सँकी सोल्युशन्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या कॅम्पस निवड प्रक्रियेतून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       'सँकी सोल्युशन्स’ या नामांकित दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून सागर नवनाथ थोरात, स्वप्नील कांतीलाल उबाळे व विठ्ठल अशोक शिरसाळे या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु.४ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. ‘सँकी सोल्युशन्स’ ही ‘इनोव्हेशन लॅब’ म्हणून डिझाईन विश्वातील  पहिली तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. ही नामांकित कंपनी ॲडव्हान्स सॉफ्टवेअर, डेटा इंजिनिअरिंग आणि अॅनालॅटिकल सोल्युशन्स या क्षेत्रात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad