*सिंहगडच्या २३ विद्यार्थ्यांची "पीटीसी" कंपनीत निवड*
○ तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच सिंहगड मधुन नोकरी
पंढरपूर: प्रमोद बनसोडे
अभियांञिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट मधुन मिळण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट नेहमीच प्लेसमेंट पुर्व प्रचंड सराव, मुलाखती व चर्चासत्र आयोजित करण्यात करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाच्या जोरावर प्लेसमेंट मुलाखतीसाठी परफेक्ट तयारीने सामोरे जाण्याचे प्रशिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये दिले जात असल्याने यावर्षी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या २३ विद्यार्थ्यांची "पीटीसी" कंपनीत निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे विभागाचे डीन प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी दिली.
"पीटीसी" कंपनीकडून जगभरातील साॅफ्टवेअर भौतिक आणि डिजिटल जग एकञ आणते. कंपन्यांना ऑपरेशन सुधारण्यास चांगली उत्पादने तयार करण्यास आणि लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये सक्षम करण्यासाठी पीटीसी कंपनी काम करत आहे. अशा या कंपनी सिंहगड इन्स्टिट्यूट काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात मध्ये चालू शैक्षणिक वर्षांतील तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच पीटीसी कंपनीमध्ये ८ लाख वार्षिक पॅकेज देणाऱ्या कंपनीत निवड झाली असुन निवड झालेले विद्यार्थी हे २०२४ या वर्षात बी ई पास आऊट होणार असुन यापूर्वीच त्यांची निवड झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून सिंहगड इन्स्टिट्यूट कौतुक व अभिनंदन केले आहे.
"पीटीसी" कंपनीमध्ये ओंकार अमले, अजित जाधव, विजया फुंड, सानिका धुमाळ, प्रथमेश पापल, तनया जगताप, रोहन खेडेकर, संकेत हरिश्चंद्रे, कृष्णा जोशी, हर्षल गिरसे, मंदार तेरखेडकर, रागिणी मानकेश्वर, वेदांत मोरे, तनिष्का माने, शितल शिरोळे, ॠषिराज कुडपने, भक्ती पटारे, प्रथमेश सिनकर, श्रृती सांडभोर, प्रथमेश चौधरी, जशराज पाटील, नितीन आंधळे आणि श्रृती गाडेकर आदी २३ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रो. मारूती नवले, सह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.