सुरेखा बिडगर यांची पी. एस.आय पदी वर्णी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक धनगर समाज संघटनेच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील उसवाडच्या धनगर समाजाच्या सुरेखा बिडगर ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2020 च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातली नाही तर राज्यात प्रथम येण्याचा मानही मिळवला आहे.
सुरेखा बिडगर यांचे शिक्षण उसवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले उच्च माध्यमिक शिक्षण चांदवडच्या नेमिनाथ शिक्षण संस्थेत तर एफ वाय मध्ये असताना 2006 मध्ये प्रशांत शेळके या अभियंत्यासोबत लग्न झाले. एस वाय नंतर त्यांचे शिक्षण पतीने पूर्ण केले त्यानंतर 2013 मध्ये b.ed पूर्ण करून सन 2015 मध्ये शिक्षक म्हणून पी एन नाईक शिक्षण संस्थेत नोकरीला प्रारंभ केला मात्र त्यांना वर्दीचे आकर्षण स्वस्त बसू देत नसल्याने रात्रंदिवस वाटत होते की मी वर्दीमध्ये दिसले पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट करून अखेर राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरवले पतीसोबत चर्चा केल्यानंतर पतीने सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास करावा याने मार्गदर्शन केले सन 2020 मध्ये परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पास होणार याची खात्री होती मात्र मुलींमध्ये राज्यात प्रथम येणार अशी कधीच कल्पना केली नव्हती. असे त्या म्हणाल्या मात्र निकाल जाहीर झाल्यावर आनंदाला पारा उरला नाही त्याचे श्रेय सूरेशा या आपल्या कुटुंबियांना देतात.
धनगर समाजाच्या सुरेखाताई यांची राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला अशी माहिती मिळताच धनगर समाजाचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सुरेखा ताईशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून ताईंना शुभेच्छा दिल्या व सोनसळे यांच्याशी संवाद साधताना सुरेखाताई म्हणाल्या की जो पर्यंत मी अधिकारी होत नाही तोपर्यंत साधा मोबाईल ही पण वापरणार नाही अशी जिद्द त्यांनी केली होती त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतरच त्यांनी मोबाईला हात लावला आज त्यांना या निवडीबद्दल अखंड महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशा प्रत्येक मुलींनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे. असे अधिकारी बांधवांशी तळमळ असलेले युवकांचे युवा स्थान प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी सुरेखाताई यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या संवादामध्ये म्हटले आहेत आज सुरेखा ताई यांच्यासारख्या महिला मोठ्या पदावर जाऊन अधिकारी झाल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळेस म्हटले आहे.