पंढरपूर सिंहगड पब्लिकच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

 *पंढरपूर सिंहगड पब्लिकच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*



पंढरपूर: 


सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (ता.पंढरपूर) येथील १० व १२ वी सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये शुक्रवार दिनांक ७ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती स्कूलच्या उपक्रमशील प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.



   या कार्यक्रमाची सुरवात विद्येची आराध्यदैवत सरस्वती पूजन सिंहगड संस्थेच्या डायरेक्ट आशा बोकील, माजी प्राचार्या उषा धापोला, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्ट डाॅ. कैलाश करांडे, प्राचार्या स्मिता नवले, स्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता नायर आदींच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलनाने तसेच स्कूल मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन करून मान्यवरांचे स्वागत केले. 

    


 या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिंहगड पब्लिक स्कूलच्या वतीने इयत्ता दहावीतील प्राची पवार, सिद्धी शिंगाटे, समृद्धी भानवसे, प्राप्ती भट्टड, रिया पाटील, अमृता पवार, इशिता पाटील, स्वयम ढवळे आणि इयत्ता बारावीतील निलय शहापुरे, कृष्णा भोसले, अबुलफजल नाडेवाले, अनिश तांबोळी, आयुष नाग्रस आदी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. स्कूलच्या उपक्रमशील प्राचार्या स्मिता नवले यांनी स्कूल शैक्षणिक वर्षांतील आढावा उपस्थित पालकांसमोर सादर केला.

      या कार्यक्रमात माजी प्राचार्या डाॅ. उषा धापोला व सिंहगड संस्थेच्या संचालिका आशा बोकील यांनी उपस्थित पालकांना संबोधित केले. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनव्ही माने, आदित्य बोचरे व पुर्वा डोळस हिने केले तर उपस्थितांचे आभार स्वरूपानंद मोटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad