सर्वसामान्यांचा आशिर्वाद हाच देवेंद्र फडणवीस साहेबांची आयुष्याभराची मिळकत - प्रणव परिचारक.
महाराष्ट्र राज्याचे विकासप्रिय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी,पंढरपूर आणि पांडूरंग परिवार युवक आघाडीच्या माध्यमातुन जिल्हाचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणच्या वृध्दाश्रम, अनाथाश्रम, बालकाश्रम, अंध-अपंग शाळा अश्या अनेक ठिकाणी "अन्नदान-सेवा कार्य" करून आदरणीय फडणवीस साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यासाठी उपक्रम राबविला आहे, अशी माहिती भाजपा युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेऊन सरकारला पाठिंबा दिलेले नूतन उपमुख्यमंत्री धडाडीचे नेतृत्व ना.अजितदादा पवार साहेब यांचीही आज वाढदिवस असल्याने त्यांनाही मनःपुर्वक शुभेच्छा युवक नेते प्रणव परिचारक यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे, पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, मा. उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, नगरसेवक संग्राम अभ्यंकर, जि.उपाध्यक्ष सुभाष मस्के सर, शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ, भाजपा प्रभारी अक्षय वाडकर, युवा मोर्चा अध्यक्ष लाला पानकर, संदिप माने, राजाभाऊ कौलवार, राहूल परचंडे, विनायक संगीतराव, हर्षल कदम, रणजित जाधव, निलेश मोहिते, तामिम इनामदार, बालाजी बंदपट्टे, भाऊ टमटम, अमित कसबे, कौस्तुभ डोळे, दिगंबर कांबळे, सावळा शेंबडे, विजय भुसणर, महादेव गाढवे, प्रसाद कोळेकर, सुमित पारखे, युवराज अष्टेकर, प्रसाद कुंभारकर, आनंद कासट, संदीप कळसुले, विष्णू सुरवसे, बाळासाहेब बागल, मोहन काळे, दीपक येळे, भूषण माने, प्रशांत सापणेकर, आप्पा नाईकनवरे, धनाजी दुबल यांच्या सह जेष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी मित्र उपस्थित होते.