*पंढरपूर सिंहगड मध्ये "एन इ पी की समज" या विषयावर स्पर्धा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर्फे "एन इ पी की समज" यावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हि स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या "एन इ पी की समज" या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अकरा प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांचे उत्तर स्पर्धेत सहभागी स्पर्धकांने व्हिडिओ स्वरूपात दिले.
एन इ पी की समज हे प्रश्न एनईपी २०२० याविषयावर होती. या स्पर्धेमध्ये उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. यशवंत पवार, प्रा. धनंजय गिराम, प्रा. अनिता शिंदे, प्रा. दत्तात्रय कोरक, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. अंजली पिसे, प्रा. रमेश येवले, प्रा. श्याम भीमदे आदी प्राध्यापकांनी विविध प्रश्नांचे उत्तरे व्हिडिओ स्वरूपात सादर केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, अमोल नवले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.