*पंढरपूर सिंहगड मध्ये आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र काणे, डाॅ. वर्षा काणे, डॉ. अनिल पवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सिंहगड कॉलेज च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.
डाॅ. काणेज् गायञी हाॅस्पिटल यांच्या वतीने पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज व सिंहगड पब्लिक स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांचे ब्लड प्रेशर, हिमोग्लोबीन आणि ब्लड शुगर यांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट मधील २०० हुन अधिक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डाॅ. बसवराज सुतार, डाॅ. प्रविण कसबे, डाॅ. विद्या बेणारे, डाॅ. यासमिन निगेवान, पंकज वाघमारे, अक्षय रोडगे, बाबासाहेब घाडगे, विनायक कासलवाड, अतुल हरिदास, पुजा बावचे, जमीर शेख, नाथा मस्के आदींसह सिंहगड कॉलेज मधील शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी मानले तर उपस्थितांचे आभार डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.