दि २५ जुलै रोजी कुर्डुवाडीमध्ये अधिक श्रावणमास आर्शिवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन कुर्डुवाडी वीरशैव लिंगायत समाजाचा उपक्रम

                                                                                                

दि २५ जुलै रोजी कुर्डुवाडीमध्ये अधिक श्रावणमास आर्शिवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन

कुर्डुवाडी वीरशैव लिंगायत समाजाचा उपक्रम

कुर्डुवाडी (प्रतिनिधी)- येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मंगळवार, दि.२५ जुलै रोजी सायं.०७ वाजता अधिक श्रावण मासनिमित्त काशी येथील श्री.श्री.श्री. १००८ जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीमध्ये धर्मसभा, आशीर्वाचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे कुर्डुवाडी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने कळविले आहे. 

         कुर्डुवाडी अधिक मासानिमित्त धर्मप्रचार व जनजागृती साठी संपूर्ण भारतभर नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (काशी) व संत शिरामणी मन्मथस्वामी, तपोरत्न द्वितीय सांब शिवयोगेश्वर महाराज, बार्शी येथील श्री.ष.ब्र.१०८ माणिकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज, मानुर येथील श्री.ष.ब्र.१०८ विरूपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि २५जुलै रोजी सायं.०७ वाजता टेंभूर्णी रोड लगत असलेल्या कुबेर मंगल कार्यालय येथे जगदगुरूंचे आगमन, स्वागत, पाद्यपूजा, आर्शिवचन, ज्येष्ठ नागरिक सत्कार, महा मंगलआरती दर्शन व महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी काशी येथील डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आर्शिवचन व धर्मसभा होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ‘अधिकमास हे परमार्थीक साधना करीता अत्यंत श्रेष्ठ असुन या महिन्यामध्ये जप, साधना, दान धर्माचरण आदिच्या माध्यमातुन आत्मोद्धार करुन घेण्यासाठी श्रेष्ठ वेळ समजली जाते. समाज कल्याणाकरिता विश्वशांती, धर्माभिवृद्धीचा, शिवसंकल्प घेऊन श्री. श्री. श्री १००८ जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामाजी गेली अनेक वर्ष अधिक मासामध्ये तपोअनुष्ठाण, धर्मसभा करुन सर्वांना शुभाशिर्वाद देत आहेत. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटूंब वेळेवर उपस्थित राहुन जगद्गुरुंचा दर्शन व आर्शिवचनाचा लाभ घेऊन पुनित व्हावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे. आर्शिवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा. ९४२१०४०४३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज, कुर्डुवाडीच्या वतीने केले आहे. 

छायाचित्र- श्री.श्री.श्री. १००८ जगदगुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad