स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘विप्रो पारी’ या रोबोटिक्स आणि अॅटोमेशन क्षेत्रातील नामांकित कंपनीत निवड



स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘विप्रो पारी’ या रोबोटिक्स आणि अॅटोमेशन क्षेत्रातील नामांकित कंपनीत निवड



पंढरपूरः-‘विप्रो पारी’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         रोबोटिक्स आणि अॅटोमेशन क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील ‘विप्रो पारी’ या बहुराष्ट्रीय कंपनीने अॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल टेस्ट आणि मुलाखत या फेरींअंती सौरभ दत्तात्रय एडके व कृष्णा महादेव कोळी या दोन विद्यार्थ्यांची निवड केली. ‘विप्रो पारी’ या कंपनीची स्थापना १९९० साली झाली आहे. आज या कंपनीमध्ये १३०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून ही कंपनी २५ देशांमध्ये आपली सेवा देत आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘विप्रो पारी’ या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सौरभ एडके व कृष्णा कोळी यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad