शिक्षण सेवा पुरस्काराने सुप्रिया फुले सन्मानित

 *शिक्षण सेवा पुरस्काराने सुप्रिया फुले सन्मानित*



सांगोला: प्रतिनिधी



सांगोला येथे दैनिक तुफान क्रांती या वर्तमानपत्राच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा "शिक्षण सेवा पुरस्कार" प्रा. सुप्रिया फुले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे उद्घाटन पञकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, तुफान क्रांती चे संस्थापक मिर्झागालिब मुजावर, रजाक मुजावर, मुजावर मॅडम, मगर मॅडम, भीमसेन चव्हाण, जितेस कोळी, मराठी अभिनेते किरण जाधव, तौहीत मुल्ला, डाॅ. परेश खंडागळे, माजी प्राचार्य सोनवले मॅडम आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अतिशय कष्टातुन शिक्षण पुर्ण करून विद्यार्थ्यांना ज्ञाने धडे देत असलेल्या विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील प्रा. सुप्रिया फुले यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन शिक्षण सेवा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    या कार्यक्रमास या कार्यक्रमास वडील बाबुराव वाघमारे, आई सुनिता वाघमारे, बहिण उमा नवले, कुमार नवले, कोमल फुले, क्रुणाल फुले आदीसह सोलापूर जिल्ह्य़ातील विविध भागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुप्रिया फुले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल माळी समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad