*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २६ मे २०२३ रोजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
एस के एन सिंहगड कॉलेज पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून रामचंद्र उत्पात हे उपस्थित होते. या मेळाव्यात उपस्थित पालक प्रतिनिधी सर्व पालकांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित पालकांसमोर विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा पालकांसमोर सादर केला.
यावेळी पालक प्रतिनिधी रामचंद्र उत्पात
बोलताना म्हणाले, सिंहगड संस्था ही एक अभियांत्रिकी शिक्षणामध्ये नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून सर्वत्र आज परिचित आहे. या शैक्षणिक संस्थेत आज अने विद्यार्थी करियर करत आहेत. याच संस्थेतील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरी तसेच नामांकित कंपन्या चांगल्या प्रकारे करिअर करत आहेत. या संस्थेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधाही या उत्तम पद्धतीने देण्यात येतात. सिंहगडची खास बाब म्हणजे सिंहगड कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून सिंहगड संस्थेतील शिक्षक व शिक्षक केंद्र कर्मचारी वृंद परिश्रम घेत असल्याचे मत पालक प्रतिनिधी रामचंद्र उत्पात व सूर्यकांत कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या पालक मेळाव्यात उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त केले. हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अंजली चांदणे सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.