पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियाञिकीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता. पंढरपूर) येथे प्रथम वर्ष अभियांञिकीचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या पालक मेळाव्यात प्रथम वर्ष अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांचा ट्रॅक चुकत असेल तर पालकांनी व शिक्षकांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांला ट्रॅकवर आणले पाहिजे. शैक्षणिक गुण पालकांना त्यांच्या मोबाईल फोन पाठवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा चालू शैक्षणिक वर्षांचा निकाल विद्यापीठात सर्वोत्कृष्ट लागला आहे. विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण देणेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. वार्षिक परीक्षेच्या पुर्वी सर्व अभ्यासक्रम वेळेत पुर्ण करण्यात येणार असुन एखादा विषय न समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांना भेटून न समजलेला विषय समजुन घेणे आवश्यक असल्याचे मत प्रा. अनिल निकम यांनी व्यक्त केले.
ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, प्लेसमेंट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्गाने पास होणे आवश्यक आहे. सोलापूर विद्यापीठांमध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट मध्ये सर्वाधिक असून यापेक्षाही सर्वाधिक प्लेसमेंट होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. सिंहगड महाविद्यालय असे महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयात प्लेसमेंट होण्यासाठी कोठे बाहेर प्रशिक्षण घ्यावी लागत नाही. प्लेसमेंट साठी आवश्यक असलेले प्रशिक्षण सिंहगड पंढरपूर महाविद्यालयात मोफत विद्यार्थ्यांना दिले जाते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्रजीचे वाचन करणे आवश्यक आहे यासाठी इंग्रजी वर्तमानपत्र नियमित वाचणे गरजेचे आहे. आयटी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कोविडच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन मुलाखती द्यावा लागल्या. सध्याच्या परिस्थितीतही कंपन्याकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येत आहे. यासाठी कंपनीकडून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुलाखती घेण्यात येतात यामध्ये विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप असणे आवश्यक आहे. महाविद्यालयात घेण्यात असलेल्या स्पर्धेत प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे मत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम घेण्यात येत असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारीनिशी परीक्षेत उतरणे आवश्यक असल्याचे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पालक रफिक नदाफ व महेश कुलकर्णी हे पालक प्रतिनिधी उपस्थित होते. पालक प्रतिनिधी रफीक नदाफ बोलताना म्हणाले, सिंहगड महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण हे सर्वोत्तम आहे. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सिंहगड महाविद्यालयातील सर्व शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महाविद्यालयाला नुकतेच ए प्लस मानांकान मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे पालकांकडून अभिनंदन करायचा करण्यात आले.
यादरम्यान महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे पालकांकडून कौतुक करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सिंहगड संस्थेचे शैक्षणिक कार्य हे उत्तम पद्धतीने चालत असल्याचा आत्मविश्वास पालकांनी आदरम्यान बोलताना व्यक्त केला.
यादरम्यान प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या पालक मेळाव्यात विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी उपस्थित पालकांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले. हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.