*पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयामधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार २६ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती स्थापत्य अभियांञिकी विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
या मेळाव्याची सुरवात पालक प्रतिनिधी सुधाकर धोकटे, डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमा बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अपार परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे यादरम्यान बोलताना पालक प्रतिनिधी बोलताना म्हणाले, यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवीत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना उत्तम स्थापत्य अभियंता पाहिजे असेल तर सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण करावा असे आवाहन केले यावेळी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालक प्रतिनिधी आणि उप प्राचार्य यांच्या हस्ते पार पडला. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी पालकांसमोर विभागाचा लेखाजोखा मांडला.
हा पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशवंत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.अमित करांडे यांनी मानले.