सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो: अभिजीत पाटील

 *सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो: अभिजीत पाटील*


*(विठ्ठलचे माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड व मा.संचालक संतोष दादा गायकवाड यांसह अनेकांचे अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश)*


*(गादेगाव विकास सेवा सोसायटी मा.संचालक विक्रम (आबाजी) बागल, ॲड. उदयसिंह बागल यांनी देखील प्रवेश केला)*


*सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद*



प्रतिनिधी पंढरपूर/-


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त चळे येथे अभिजीत पाटील गटाची सभा झाली यामध्ये चळे गावचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर बापू मोरे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात जाहीर प्रवेश करत त्यांना आशीर्वाद देत विठ्ठल कारखाना देखील अभिजीत पाटलांशिवाय कोणी चालू शकत नव्हता आणि त्यांनी यशस्वी गाळप करून शेतकऱ्यांना मागील सर्व थकीत देणी देण्याचे काम अभिजीत पाटील यांनी केल्यामुळे आम्ही सर्व पारदर्शक कारभार करणाऱ्या आणि कारखाना चालवणारे माणसाच्या पाठीमागे आमचे आशीर्वाद आणि भक्कम साथ राहील असे यावेळी ज्ञानेश्वर बापू यांनी सांगितले.


साखर कारखान्याची निवडणूक असून विरोधकांकडून प्रचाराचे मुद्दे भरकटण्याचे काम सुरू आहे. साखर कारखानदारी ऊस बिल केलेलं गाळप शेतकऱ्याची थकीत बिल यावर बोलण्या ऐवजी प्रचार दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रकार केल्याचा आरोप अभिजीत पाटील यांनी यावेळी केला.


चळे येथे झालेल्या सभेमध्ये विविध पदाधिकाऱ्यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला. चळे गावातील अनेक सभासदांचे सभासदत्व रद्द केले आहे कल्याणराव काळे यांनी गावातील सभासदांची कधीच संपर्क ठेवला नाही उसाची बिल कधीच वेळेवर दिले नाहीत यामुळे सभासद कल्याण काळे यांच्यावर नाराज आहे त्यामुळे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड, माजी संचालक संतोष गायकवाड, विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर बापू शिखरे, उपसरपंच अमोल मोरे, माजी उपसरपंच सचिन मोरे, माजी उपसरपंच चरणदास कोळी, सुशील वाघमारे, प्रताप दादा गायकवाड, डॉ.रामदास घाडगे, समाधान लोमटे (पुळूज)यासह अनेकांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.


अभिजीत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, सत्ताधाऱ्याकडून निवडणूक भरकटवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ऊस बिल कधी मिळणार यावर बोलत नाहीत 31कोटी बिल कसे देणार हे सांगत नाहीत येणारा पुढील गाळप हंगामासाठी पैसे कुठून उपलब्ध करणार हे सांगत नाहीत. कारखान्यासाठी 426 कोटी रुपये कर्ज काढला आहे त्याचं काय केलं हे सांगत नाहीत निवडणूक भरकटवण्यापेक्षा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या असे आव्हान अभिजीत पाटील यांनी कल्याणराव काळे यांना दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad