*बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग” या विषयावर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी इमारत माहिती मॉडेलिंग या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. हे व्याख्यान डॉ. रोहन विजय नलावडे यांनी दिले. त्यावेळी बोलताना त्यांनी इमारतीचे आयुष्य कसे पडताळायचे व कसे वाढवायचे हे संगितले.
हे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने पार पडले अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातिल ८० हुन अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व CESA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. शेवटी प्रा. सुजित राठोड यांनी पाहुणे डॉ.रोहन विजय नलावडे, विधार्थी व सर्व शिक्षकांचे आभार मानले.