*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे जावा प्रोग्रॅमिंग प्रशिक्षण संपन्न*
पंढरपूर प्रतिनिधी : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ५ ऑगस्ट २०२५ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जावा प्रोग्रॅमिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे संचालन श्री. अजिंक्य गायकवाड यांनी केले.
सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात जावा प्रोग्रामिंग ही एक अत्यंत आवश्यक व उद्योगाभिमुख कौशल्य ठरली आहे. विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील मागणींशी जुळवून देण्यासाठी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर या संस्थेमार्फत जावा प्रोग्रामिंगचे विशेष प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना कोअर जावा, ॲडव्हान्सड जावा, फ्रेमवर्कस इत्यादीची सखोल माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. हे प्रशिक्षण जीटीटी कंपनीच्या सहकार्याने कार्पोरेट सोशल रिसपॉनसिबीलीटी उपक्रमांतर्गत मोफत राबवले गेले.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत होण्यास महत्त्वाचा हातभार लागला आहे. सोलापूर जिल्हयामध्ये अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांसाठी कॉग्नीझंट, एलटीआय माईंड ट्री इ. कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी फक्त सिंहगड महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठीच सप्टेंबर महिन्यात उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी जावा प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण विदयार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केली.
हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

