स्वेरीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

                                                                                                  

स्वेरीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी




पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा सप्ताह’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात आली. 

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या सूचनेनुसार स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त आयोजिलेल्या ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ राष्ट्र स्वच्छता अभियान आयोजित करण्याची सूचना देण्यात आली होती त्या अनुषंगाने  स्वेरीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. यशपाल खेडकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महत्वाची माहिती दिली. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जीवनपट आणि राष्ट्र उभारणीसाठी केलेले महत्वपूर्ण योगदान सांगून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ‘एकात्म मानव दर्शन’ हे विद्यार्थ्यांच्या समोर ठेवले. सदरचा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. गिरीश फलमारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad