*"विद्युत वाहनांमधील नवनवीन प्रवाह" या विषयावर एस. के. एन. सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथे तज्ज्ञ व्याख्यानाचे* आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि IEEE विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्युत वाहनांमधील नवनवीन प्रवाह" या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. शिवशंकर कोंडूरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकताना विद्युत वाहन क्षेत्रातील वाढती गरज आणि त्यातील सखोल ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.
या विशेष व्याख्यानासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. एस. आर. कोळी यांनी उपस्थित राहून विद्युत वाहनांवरील नवीनतम घडामोडी, पर्यावरणपूरक ऊर्जा वापर, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (Battery Management System), चार्जिंग स्टेशनची आवश्यकता तसेच भविष्यातील संशोधनाच्या संधी यासारख्या विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य व IIC अध्यक्ष डॉ. एस. जी. कुलकर्णी, तसेच IEEE विद्यार्थी शाखेचे सल्लागार डॉ. शिवशंकर कोंडूरु यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ यांनी संयोजनाचे काम समर्थपणे पार पाडले.
या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्युत वाहन उद्योगातील अद्ययावत व उपयुक्त ज्ञान प्राप्त झाले असून, त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळाली आहे. विद्युत वाहने ही जागतिक स्तरावर वाढणारी गरज लक्षात घेता, या विषयावरील असे तज्ज्ञ व्याख्यान विद्यार्थी आणि संशोधकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे.

