कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील ओंकार लेंडवे ची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.

 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील ओंकार लेंडवे ची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.



पंढरपूर/ प्रतिनिधी 

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी मुलांचा कबड्डी संघ निवडण्यात आला यामध्ये पंढरपूर मधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील ओंकार लेंडवे या खेळाडूंची निवड झाली आहे. या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा इंदोर (मध्य प्रदेश ) येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी विविध राज्यातून 110 विद्यापीठ संघ सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेसाठी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा संघ सज्ज झाला आहे.

या निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत,उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डॉ. गजधाने डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी केले. तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले, आणि प्रा.मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.

ही निवड कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या खेळाडूला विद्यापीठ पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad