सिंहगड महाविदयालय, पंढरपूर येथे द्वितीय व तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचे आयोजन*

 *सिंहगड महाविदयालय, पंढरपूर येथे द्वितीय व तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचे आयोजन*



पंढरपूर, जुलै २०२५ –एस. के. एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगीतले. 

या सत्रांचे उद्घाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. या सत्रांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विभागाची माहिती देणे, शैक्षणिक अपेक्षा स्पष्ट करणे आणि आगामी संधींबाबत मार्गदर्शन करणे हे होते. विभागप्रमुख कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, कौशल्य विकास आणि उद्योग सुसंगततेबाबत समर्पक मार्गदर्शन केले.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना विभाग व महाविद्यालयाचे व्हिजन आणि मिशन, तसेच कोर्स आउटकम्स, प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स आणि प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह्ज यांची माहिती देण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आधारित अभ्यासक्रम संरचनेचे स्पष्टीकरण देण्यात आले, ज्यामुळे बहुविध कौशल्य विकासाला चालना मिळते. 

शैक्षणिक मूल्यांकन प्रणाली, अध्यापन पद्धती, व आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती देण्यात आली. MESA (Mechanical Engineering Student Association) च्या उपक्रमांची ओळख आणि सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम्स आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांबाबत माहिती देण्यात आली.

व्हर्च्युअल लॅबचा वापर करून प्रयोगांचे आभासी सादरीकरण कसे करता येते याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. मिनी प्रोजेक्ट्स व आंतरशाखीय प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान कसे आत्मसात करावे यावर भर देण्यात आला. विभागातील विदयापीठाच्या परिक्षेतील गुणंवत विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा, कन्सल्टन्सी प्रकल्प आणि औद्योगिक भेटी यांचा आढावा देखील घेण्यात आला.

सत्राची सांगता प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी संदेशाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचे, नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आणि करिअरमध्ये उत्कृष्टता साध्य करण्याचे आवाहन केले.

या ओरिएंटेशन सत्रांद्वारे विभागाने विद्यार्थ्यांना एका सकारात्मक, गुणात्मक आणि उद्योग-उपयुक्त शैक्षणिक वातावरणात प्रवेश देण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

हा कार्यक्रम पार पाडण्याकरीता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad