*पंढरपूर सिंहगड येथे विदयुत अभियांत्रिकी विभागात इंट्रोडक्शन टू पायथॉन अँड इट्स एप्लीकेशन्स फॉर इलेक्ट्रिकल इंजिनियर या विषयावर कार्यशाळा संपन्न*
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत दिनांक १२ जुलै २०२५ रोजी इंट्रोडक्शन टू पायथॉन अँड इट्स एप्लीकेशन्स फॉर इलेक्ट्रिकल इंजिनियर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व पॅन्टेक ई लर्निंग यांच्यातील सामंजस्याचा करार या अंतर्गत ही कार्यशाळा पार पडली. श्री. गुहान एस. यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंगची मूलभूत संकल्पना, सिंटॅक्स, आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील विविध अनुप्रयोगांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विभागप्रमुख डॉ. शिवशंकर कोंडुरु, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, आणि यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि पायथॉनचा उपयोग विविध प्रोजेक्ट्स व संशोधनात कसा करता येईल याची उपयुक्त अशी माहिती मिळवली.
ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता विभागातील कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. किशोर जाधव, प्रा. नागन्नाथ खांडेकर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

