*आषाढी वारीमध्ये सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पोलिस मित्र म्हणून सहभाग.*
एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ६ जुलै २०२५ या दिवशी पार पडलेल्या आषाढी वारी मध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान माहिती व मदत पोलीस प्रशासन सोलापूर विभाग यांच्या सोबत वारक-यांच्या सेवेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खुप महत्वपूर्ण मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाकडून प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यादरम्यान पोलिस प्रशासनाचे अधिकारी, पीएसआय मोनिका खडके पाटील मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख सर, प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ, एनएसएस प्रेसिडेंट अथर्व कुराडे आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान पोलिस प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून सिंहगड कॉलेजचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. याशिवाय वारी मध्ये सेवा करत असताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी यादरम्यान मनोगत व्यक्त करताना सागितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

