पंढरपूर सिंहगडच्या ३ विदयार्थ्यांची भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन कंपनीत निवड* *सिव्हील इंजिनियरींगमध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध*

 *पंढरपूर सिंहगडच्या ३ विदयार्थ्यांची भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन कंपनीत निवड*

*सिव्हील इंजिनियरींगमध्ये नोकरीच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हील विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पिलीव, ता.माळशिरस येथील कु.कोमल संजय गलांडे, इसबावी, ता.पंढरपूर येथील कु.श्रेया सुरेश वांगडे व फुलचिंचोली, ता.पंढरपूर येथील कु. उज्वला जालींदर बनसोडे यांची भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन प्रा.लि., पुणे कंपनीत निवड झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.



भाटे आणि राजे कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड ही औद्योगिक, व्यावसायिक, आयटी पार्क, संस्थात्मक प्रकल्प क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. भाटे आणि राजे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून या कंपनीची स्थापना १९९० मध्ये झाली आहे. सध्या १००० पेक्षा जास्त स्थापत्य अभियंते या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी अत्याधूनिक प्रिकास्ट उत्पादन आणि बांधकाम तंत्राच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन प्रा.लि., पुणे कंपनीत वरील विदयार्थींनी जानेवारी 2025 मध्ये रुजू झाल्या आहेत. सिव्हील इंजिनियरींग विभागातर्फे प्रत्येक सत्रामध्ये विदयार्थ्यांना ॲटो कॅड, रिव्हेट, स्टॅड प्रो इ. अत्याधूनिक आवश्यक असणारे सॉप्टवेअरचे प्रशिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त सिव्हील इंजिनियरींग स्टूडंट असोशिएशनद्वारे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासकेंद्रित वेगवेगळया स्पर्धेचे आयोजन केले जाते. याचा फायदा कॅम्पसप्लेसमेंट मुलाखतीसाठी होतो. 



वरील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अमोल कांबळे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad