फॅबटेक मधील पुनम रासकर यांची "गॅब्रियल इंडिया लिमिटेड" कंपनीत निवड* □ वार्षिक ३.२ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *फॅबटेक मधील पुनम रासकर यांची "गॅब्रियल इंडिया लिमिटेड" कंपनीत निवड*


□ वार्षिक ३.२ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



सांगोला: प्रतिनिधी


फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमारी पुनम रासकर हिची "गॅब्रियल इंडिया लिमिटेड" कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.

"गॅब्रियल इंडिया लिमिटेड" हि शाॅक ॲब्साॅर्बरची एक प्रमुख उत्पादन कंपनी आहे. शाॅक ॲब्साॅर्बरच्या जोडीला फ्रंट फोर्क, स्ट्रट्स हि या कंपनीची प्रमुख उत्पादन आहेत. या प्रकारच्या उत्पादनांना 'राइड कंट्रोल इक्किपमेंट' या तांञिक नावाने ओळखले जाते. प्रवासी वाहणे, एसयुव्ही, वाणिज्य वाहने, दुचाकी यामध्ये उत्पादने वापरली जातात. या कंपनीची पुणे नाशिक, होसुर, देवास, गुरगाव आणि परवानू या ठिकाणी सहा कारखाने आहेत. हि कंपनी आनंद समूहाचा एक भाग आहे. अशा कंपनीत फॅबटेक महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थीनी कुमारी पुनम रासकर हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली होती. कंपनीकडून वार्षिक ३.२ लाख रूपये पागर देण्यात येणार आहे.

    "गॅब्रियल इंडिया लिमिटेड" कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य रविंद्र व्यवहारे , उपप्राचार्या डाॅ

 विद्याराणी क्षीरसागर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख राहूल आवताडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर धनंजय शिवपुजे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad