*फॅबटेक मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची महिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, डिन अकॅडमी डाॅ. अनुप विभुते, स्टुडंट डिन प्रा. संजय पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, विभाग प्रमुख डाॅ. तानाजी धायगुडे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळेस प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे बोलताना म्हणाले, महाविद्यालयाने चार वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले. यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा डाॅ. रविंद्र शेडगे यांनी दिल्या.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या, सद्या आय टी क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आय टी क्षेत्रातील टेक्नॉलॉजी मध्ये होणारे बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अप-टू-डेट राहणे आवश्यक असल्याचे मत डाॅ. विद्यारणी क्षीरसागर यांनी बोलताना व्यक्त केले. दरम्यान कुमार तेजस गायकवाड, कुमारी स्नेहा खेडेकर आणि कुमार चैतन्य गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रध्दा सराफ, विद्यार्थिनी कुमारी ॠतिका गायकवाड व कुमारी प्रतिभा ढगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. आतिश जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

