पंढरपूर सिंहगड महाविदयालयाची प्लेसमेंटमध्ये उत्तुंग भरारी* तृतीय वर्षातच अनुजा कोरके ने मिळविले वार्षिक १२ लाख पगाराचे पॅकेज

 *पंढरपूर सिंहगड महाविदयालयाची प्लेसमेंटमध्ये उत्तुंग भरारी*

तृतीय वर्षातच अनुजा कोरके ने मिळविले वार्षिक १२ लाख पगाराचे पॅकेज



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली भोसे, ता. पंढरपूर, जि.सोलापूर येथील कु.अनुजा महादेव कोरके हिची एनव्हीडीया कंपनीत निवड झाली असून तीला वार्षिक १२ लाख पॅकेज मिळाले असून १४ जुलै २०२५ रोजी कंपनीमध्ये इर्टंनशिपसाठी रुजू झाली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

एनव्हीडीया कंपनी ही जगातील सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी असून ही कंपनी आर्टिफिशीयल इंटिलीजीयन्स या सॉफ्टवेअरसाठी लागणा-या कॉम्प्युटर चिप्स तयार करते. या कंपनीने नुकतेच ॲपल, मायक्रोसॉप्टला मागे टाकत सध्या जगातील पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी झाली आहे. अनुजा पुणे येथे एनव्हीडीया कंपनीत रुजू झाली असून तिला इर्टंनशिपमध्ये महिना ४०,०००/- स्टायफंड मिळणार असून अंतिम वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला १२ लाख पॅकेज मिळणार आहे. तृतीय वर्षामध्ये प्रिप्लेसमेंट ऑफर देणारे पंढरपूर सिंहगड हे सोलापूर जिल्हयातील एकमेव अभियांत्रिकी महाविदयालय आहे. दरवर्षी महाविदयालयाला नामांकित बहूराष्‍ट्रीय कंपन्या विदयार्थ्यांना नौकरी देण्यासाठी तृतीय वर्षातच भेट देत असतात. अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड महाविदयालयाने विदयार्थ्यांना उत्कृष्ठ, दर्जेदार कॅम्पस प्लेसमेंट उपलब्ध करुन दिले आहे. महाविदयालयामार्फत विदयार्थ्यांमध्ये कौशल्य विकसीत होण्याकरीता वेगवेगळया उपक्रम राबविले जातात. यामुळे विदयार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास वृंध्दीगत होतो आणि याचा फायदा विदयार्थ्यांना जास्त पगाराची नौकरी मिळण्यासाठी होतो.    

अनुजा कोरके हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad