*एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात ‘एनालिसिस अँड डिझाईन ऑफ आरसीसी बिल्डिंग युसिंग ई-टॅबस’ या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न"*
कोर्टी, पंढरपूर (दि. १९ जुलै २०२५): एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "‘एनालिसिस अँड डिझाईन ऑफ आरसीसी बिल्डिंग युसिंग ई-टॅबस’" या विषयावर १४ ते १९ जुलै २०२५ दरम्यान साप्ताहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ETABS या सॉफ्टवेअरचा वापर करून बहुमजली आर.सी.सी. इमारतींचे मॉडेलिंग, ऍनालिसिस व डिझाईन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे समन्वयक आणि तज्ञ मार्गदर्शक प्रा. गणेश लकडे यांनी भूकंप, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये इमारतींचे टिकाव आणि सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबींचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून १० मजली आर.सी.सी. इमारतींचे मॉडेलिंग, विश्लेषण व डिझाईन तयार केले.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
हया कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

