पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील संगणक विभागातील आनंद होमकुमरे यांची आय.आय.टी. जम्मू येथे उच्च शिक्षणासाठी निवड
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये चतुर्थ वर्षातून उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याची आय.आय.टी. जम्मू येथे उच्च शिक्षणासाठी ( एम. टेक इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरींग ) साठी प्रवेश मिळाला असल्याची माहिती संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सुभाष पिंगळे यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या गेटच्या परिक्षेत आनंद होमकुमरे याने घवघवीत यश संपादन केले असून त्याने भारतामध्ये संगणक विभागातून सर्व विदयार्थ्यांमधून २०९८ क्रमांक पटकावला आहे. पंढरपूर सिंहगडमध्ये विदयार्थ्यांना गेट टयूटोर हे स्वॉप्टवेअर उपलब्ध करुन दिलेले आहे. महाविदयालयातील शिक्षक वर्ग गेट परिक्षेच्या तयारीसाठी विशेष अध्यापन करतात.
त्याच्या या यशाबददल संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

