पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील संगणक विभागातील दिशा होनमाने हिची दुबई येथील डेटा फि कंपनीत निवड वार्षिक ७ लाख पगाराचे पॅकेज

 पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील संगणक विभागातील दिशा होनमाने हिची दुबई येथील डेटा फि कंपनीत निवड वार्षिक ७ लाख पगाराचे पॅकेज



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पिलीव, ता. माळशिरस, जि.सोलापूर येथील कु.दिशा चंद्रकांत होनमाने हिची डेटा फि कंपनीत निवड झाली असून तीला वार्षिक ७ लाख पॅकेज मिळाले असून १ जानेवारी २०२५ रोजी कंपनीमध्ये रुजू झाली असल्याची माहिती संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाागाचे विभाग प्रमुख डॉ.सुभाष पिंगळे यांनी दिली. 

डेटा फि कंपनी ही दुबईस्थित बहूराष्टीय कंपनी आहे. या कंपनीची स्थापना पंढरपूर येथील आनंद पुजारी यांनी केली असून हि कंपनी डेटा ॲनालेटिक्स आणि फायनान्स ट्रान्सफॉर्मेशच्या क्षेत्रात १५ पेक्षा जास्त वर्ष कार्यरत आहेत. या कंपनीचे पुणे, बेंगलोर येथे कार्यालय आहेत. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्याना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनियर हे पंढरपूर सिहंगड इंजिनियरींग महाविदयालयामध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य यांचा समन्वय साधून महाविदयालयाकडून उत्कृष्ठ पध्दतीचे शिक्षण आणि प्लेसमेंटची तयारी करुन घेतली जाते. यामुळे पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विदयार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.


दिशा होनमाने हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.