स्वेरीच्या ६ विद्यार्थ्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या फॉर्च्यून ५०० लिस्टेड कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ७.५ लाखांचे पॅकेज


स्वेरीच्या ६ विद्यार्थ्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या फॉर्च्यून ५०० लिस्टेड कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. ७.५ लाखांचे पॅकेज



पंढरपूरः ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.     

        मुंबई येथे मुख्यालय असलेल्या फॉर्चून ५०० या जगविख्यात यादीमध्ये लिस्टेड असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ (आर.आय. एल.) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील संदेश सुधीर लांडे, साक्षी अशोक डोके, विनीत सयाजी गायकवाड, पवन रामचंद्र भूसनर, सुरज भजनदास काळभोर व विशाल दिलीप शिंदे अशा सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ७.५ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ ही कंपनी एनर्जी, पेट्रोकेमीकल, रिटेल, डिझीटल, सर्विसेस, मटेरीयल, मेडिया आणि इंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. संपूर्ण जगातील नावाजलेल्या प्रथम ५०० कंपन्यांमध्ये रिलायन्स कंपनीचे देखील नाव आहे. या निवड प्रक्रियेमधून हे देखील सिद्ध झाले आहे की, कोअर ब्रँचेस अर्थात सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल यांना देखील तेवढेच महत्व आहे. या ब्रँचमधुन केवळ प्रायव्हेट कंपनीत नव्हे तर सरकारी नोकरीमध्ये देखील रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याच बरोबर या ब्रँच मधील विद्यार्थी व्यवसाय करण्यासाठी देखील लवकर तयार होतात. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्सड टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्हुव अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी मधून विद्यार्थ्यांची सर्व तयारी करून घेतली जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. आज विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. स्वेरीच्या डिग्री इंजिनिअरिंगला ऑटोनॉमस दर्जा मिळाल्यामुळे, विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी आवश्यक असणारे कोर्सेस आणि तसा अभ्यासक्रम देखील बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या करिअरच्या संधी आणखी जास्त मिळणार, हे मात्र नक्की. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या या सहा ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.