पंढरपूर सिंहगडच्या अश्विनी पवार हिची कमीन्स कंपनीत निवड मेकॅनिकल विभागातील विद्यार्थीनींने पटकावले १० लाख पॅकेजची नोकरी*

 *पंढरपूर सिंहगडच्या अश्विनी पवार हिची कमीन्स कंपनीत निवड

मेकॅनिकल विभागातील विद्यार्थीनींने पटकावले १० लाख पॅकेजची नोकरी* 



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले काळगांव, ता.कराड, जि.सातारा येथील कु.अश्विनी भिमराव पवार हिची कमीन्स टेक्नॉलॉजी इंडिया लि. पुणे येथे कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कु.अश्विनी भिमराव पवार हिची कमीन्स टेक्नॉलॉजी इंडिया लि. पुणे येथे कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून तीला वार्षिक पॅकेज १० लाख मिळालेले आहे. या कंपनीत अश्विनी ही जानेवारी 2025 मध्ये रुजू झाली आहे. 


कमीन्स ही एक अमेरिकन बहूराष्टीय कंपनी आहे. १९१९ मध्ये कोलंबस, इंडियाना येथे या कंपनीची स्थापना झाली असून कमीन्स ही एक जागतीक शक्ती म्हणून विकसित झाली आहे. या कंपनीचे जगभरात १९० पेक्षा जास्त देशामध्ये कार्यालये आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयात दरवर्षी २५० पेक्षा जास्त नामांकित बहूराष्टीय कंपन्या विदयार्थ्यांना नौकरी उपलब्ध करुन देणेसाठी येत असतात. महाविदयालयाद्वारे विदयार्थ्यांना प्रथम वर्षापासून प्रत्येक सत्रामध्ये कॅम्पस प्लेसमेंट तयाराीसाठीचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. अश्विनी हिच्या या यशामुळे विदयार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.


अश्विनी हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.