पंढरपूर सिंहगडच्या युवराज ताडे यांची 3 कंपनीत निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक 3 लाख पॅकेजची नोकरी*

 *पंढरपूर सिंहगडच्या युवराज ताडे यांची 3 कंपनीत निवड

कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक 3 लाख पॅकेजची नोकरी*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले संत पेठ, माळी गल्ली, पंढरपूर येथील युवराज दत्तात्रय ताडे यांची 3 कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.


   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच युवराज दत्तात्रय ताडे यांचे, इलेक्ट्रोडिजिट ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, पुणे, (वार्षिक पॅकेज 3 लाख), एलई ट्रान्सफॉर्मेशनस, पुणे (वार्षिक पॅकेज ३ लाख), इंडोवन्स, पुणे (वार्षिक पॅकेज ३ लाख) आदी 3 कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून युवराज दत्तात्रय ताडे हे इंडोवन्स पुणे या कंपनीत मध्ये एप्रिल 2025 मध्ये रुजू झाले आहेत.


इंडोवन्स पुणे ही कंपनी २००३ मध्ये स्थापन झााली असून मेकॅनिकल कॅड कॅम क्षेत्राात डिझाईन विभागात सेवा प्रदान करते. अशा या कंपनीत युवराज ताडे यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.