पंढरपूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्यांचे जापनीज भाषेच्या परीक्षेत यश जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर: प्रतिनिधी

पंढरपूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्यांचे जापनीज भाषेच्या परीक्षेत यश

 जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय
पंढरपूर: प्रतिनिधी



  अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मधुन नोकरी मिळविणे हाच मुख्य हेतु असतो. विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत नोकरी मिळावी यासाठी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये जापनीज भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. हि भाषा आय. टी. क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालय हे जापनीज भाषा शिकविणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव इंजिनिअरींग कॉलेज असुन या कॉलेज मधील मेकॅनिकल विभागातील हरिप्रिया नारायण कुलकर्णी, संगणक विभागातील अश्विनी चंद्रकांत कदम, भाग्यश्री अनिल मोहिते व साजीद शुकूर तांबोळी अशा ४ विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेतील परीक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     विद्यार्थ्यांना जापनीज भाषा शिकण्यासाठी पुणे, मुंबई येथे ३०  हजार पेक्षा जास्त मोजावे लागतात परंतू हिच भाषा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून माफक फिमध्ये प्रशिक्षण दिले जाते.  चालू शैक्षणिक वर्षामध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ३  विद्यार्थी ( चिक महूद, तालुका सांगोला येथील अश्विनी कदम, कचरेवाडी, तालुका मंगळवेढा येथील भाग्यश्री मोहिते व पंढरपूर येथील साजीद तांबोळी ) जपान सरकारची "जापनीज जेएलपीटी एन ५" परीक्षेत उत्तीर्ण झाले असुन पंढरपूर येथील कुमारी हरिप्रिया नारायण कुलकर्णी ही एन ५ , एन ४ आणि एन ३ परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

प्रत्येक वर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मध्ये जापनीज भाषा माहित असेलल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या नामांकित आय टी क्षेत्रातील कंपन्या कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येत असतात. गेल्या दोन वर्षात, २३ विद्यार्थी जापनीज भाषेची परीक्षा उत्तीर्ण झाले असुन 
 जापनीज भाषेतील प्रशिक्षणामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मध्ये भरगच्च पगाराची नोकरी मिळते.
 
   जापनीज प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जपान टोकियो मध्ये नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एन ५, एन ४ आणि एन ३ सर्टिफिकेट मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी थेट टोकिओ मध्ये जपान थर्ड पार्टी या कंपनीत महिन्याला अडीच लाख म्हणजे वार्षिक ३० लाख पगाराची नोकरीची संधी मिळते. जापनीज भाषेचे प्रशिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज जिल्ह्यातील एकमेव असुन प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
    
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad