पंढरपूर सिंहगड मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन*



एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे सस्टेनेबल इनोव्हेशन इन सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजीनियरिंगज्ञ विषयातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २७ व २८ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे यांनी दिली.

या परिषदेचे उद्दिष्ट शाश्वत अभियांत्रिकी पद्धतींमध्ये परिवर्तनकारी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा करण्यासाठी संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग तज्ञांना एकत्र आणणे आहे.

सदर परिषदेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक प्रा. मोहन कोल्हे, प्रा. कोकी ओगुरा, प्रा. गॅल्वेझ सोटो एडुआर्दो अँटोनियो, प्रा. अतुल सागडे, प्रा. एडगर एस्टुपिनन, प्रा. एम ए तौफिक, प्रा. एच. एम. सादेलदीन इल शाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही आंतरराष्ट्रीय परिषद युनिव्हर्सिटी ऑफ तारापाका, चिली; युनिव्हर्सिटी ऑफ अगदेर, नॉर्वे, क्यूशू  संगयो युनिव्हर्सिटी, जपान आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने होणार आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मटेरियल, क्लीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोवेशन इन बिल्डिंग, जिओ टेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन विषयातील सस्टेनेबल डेव्हलपमेंट विषयावरती विद्यार्थी, संशोधक विद्वान, शिक्षण तज्ञ, शास्त्रज्ञ शोध निबंध सादर करतील. याचा फायदा प्रामुख्याने संशोधन, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात होणार आहे.

देश व परदेशातील नामांकित संस्थेतील १०० हून अधिक तज्ञ व्यक्तींनी आपल्या शोध निबंध द्वारे आपला सहभाग नोंदवला आहे.

या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे स्प्रिंजर‌ नेचर प्रकाशन समर्थन, जे संशोधकांना त्यांचे उच्च-गुणवत्तेचे संशोधन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रकाशित करण्याची संधी देते.

प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने नॅक ए प्लस तसेच एनबीए मानांकन मिळवलेले आहे. जागतिक कीर्तीचे अभियांत्रिकी शिक्षण देणारी संस्था बनविणे या ध्येयाने प्रेरित होऊन संस्थेने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. या परिषदेमुळे स्थापत्य अभियांत्रिकी आणि यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रांमधील जगविख्यात संशोधक येणार आहेत त्यामुळे या क्षेत्रामध्ये संशोधन गतीमान होऊन त्याचा फायदा समाजाला होणार आहे.

ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी कॉन्फरन्स चेअर म्हणून डॉ स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, विभाग प्रमुख डॉ श्रीगणेश कदम, डॉ. श्याम कुलकर्णी, समन्वयक म्हणून डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सत्यवान जगदाळे, श्री ओमकार बिडकर हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad