फॅबटेक पॉलिटेक्निक एमएसबीटीई उन्हाळी परीक्षेचा उच्चांकी निकाल* □ २१ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती

 *फॅबटेक पॉलिटेक्निक एमएसबीटीई उन्हाळी परीक्षेचा उच्चांकी निकाल*


 □ २१ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती



सांगोला: प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी दिली.


      फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मधील प्रथम वर्ष कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील वजीर आदक्षर (९२.४७%), शितल कुंभार (९२.२४%) आणि सरला अभंगराव (९२.१२%) गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तन्वी नवले (९१.१८%), स्नेहल भोसले (९०%) आणि श्रीराम काटे (८९.८८%) गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आकाश म्हेञे (९०%), वैभवी भोसले (९०%) धनश्री कोळेकर (८८.७८%) गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील कोमल मेटकरी (८८.६७%), साक्षी ढोबळे (८४.५६%) आणि शिवम साळुंखे (८४%) गुण प्राप्त करून यश प्राप्त केले आहेत.


 या शिवाय फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज मधील प्रथम वर्षांतील १५ विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण, द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रोडक्शन प्रोसेस या विषयात ५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत तसेच तृतीय वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रिनेव्हेबल एनर्जी टेक्नॉलॉजी या विषयात गणेश मिसाळ या विद्यार्थ्यांने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.


फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणेसाठी फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज सतत नवीन व प्रभावी शैक्षणिक धोरण अवलंब असते. महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट देण्याची परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाअंतर्गत घेण्यात येत असलेल्या परीक्षेची अभ्यासपूर्ण तयारी करून घेतली जाते. यामध्ये टेक्निकल कौशल्याचे धडे विद्यार्थ्यांना दिल्याने फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.


   पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य तानाजी बुरूंगले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad