स्वेरी संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नूतन अध्यक्षपदी अशोक भोसले यांची, उपाध्यक्षपदी सुरेश राऊत यांची तर सचिव पदी प्रा. सुरज रोंगे यांची निवड



स्वेरी संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड


नूतन अध्यक्षपदी अशोक भोसले यांची, उपाध्यक्षपदी सुरेश राऊत यांची तर सचिव पदी प्रा. सुरज रोंगे यांची निवड



पंढरपूर: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून विशेष शैक्षणिक योगदान देत असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील ‘स्वेरी’ तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी अशोक भोसले यांची, उपाध्यक्षपदी सुरेश राऊत यांची तर सचिव पदी प्रा. सुरज रोंगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

               गोपाळपूरच्या ओसाड माळरानावर सन १९९८ साली ‘स्वेरी’ तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेअंतर्गत पदवी अभियांत्रिकी (डिग्री इंजिनिअरिंग), पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग), पदवी औषधनिर्माण शास्त्र (बी.फार्मसी), पदविका औषधनिर्माण शास्त्र (डी.फार्मसी) तसेच एम.बी.ए., एम.सी.ए., एम.टेक. व पीएच.डी. पर्यंतची महाविद्यालये सुरळीतपणे सुरु आहेत. स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बाळे, सोलापूरचे विद्यमान अध्यक्ष डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नेतृत्वाखाली व १४ विश्वस्तांच्या सहकार्याने स्वेरीने शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात सातत्याने 'पंढरपूर पॅटर्न'च्या माध्यमातून नवीन प्रयोग करत असताना यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आणि अजूनही ही घोडदौड सुरूच आहे आणि याच यशस्वी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पदांची निवड आज करण्यात आली.

या प्रसंगी मावळते अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अशोक भोसले यांचा, माजी अध्यक्ष व विश्वस्त सी.बी. नाडगौडा यांच्या हस्ते उपाध्यक्ष सुरेश राऊत यांचा आणि माजी उपाध्यक्ष व विश्वस्त रामराव रिसवडकर यांच्या हस्ते नूतन सचिव प्रा. सुरज रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष अशोक भोसले म्हणाले कि, 'स्वेरी या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थेचे सर्व सदस्य, पदाधिकारी व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही निवड केवळ माझ्यासाठी सन्मानाची बाब नाही, तर हे एक मोठे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, याची मला जाणीव आहे. शिक्षण, मूल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या चार आधार स्तंभांवर उभा असलेला हा संस्थेचा प्रपंच अधिक भक्कम करण्यासाठी मी अध्यक्ष म्हणून अजून जास्त काम करणार आहे.' आपले मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष सुरेश राऊत म्हणाले कि, 'स्वेरी संस्था ही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा प्रकाशस्तंभ आहे. स्वेरीचा नावलौकिक अबाधित ठेवून संस्थेच्या अधिक प्रगतीसाठी एकजुटीने काम करणार आहोत.' संस्थेचे नूतन सचिव प्रा.सुरज रोंगे म्हणाले कि, 'संस्थेच्या सचिवपदी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व विश्वस्त, पदाधिकारी व संस्थेच्या सर्व घटकांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. ‘स्वेरी’ ही एका उदात्त स्वप्नातून आणि शून्यातून निर्माण झालेली संस्था आहे. स्थापनेपासून स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व सर्व विश्वस्तांनी अहोरात्र कष्ट घेऊन संस्थेच्या नाव लौकिकासाठी अपार कष्ट केले. तीच प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या भविष्यातील भरभराटीसाठी अथक प्रयत्न करणार आहे.'

स्वेरीचे मावळते सचिव आणि स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, बाळे, सोलापूरचे विद्यमान अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांचा स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त सी.बी.नाडगौडा यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले कि, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या ध्येयाने १९९३ साली सुरुवातीला आम्ही हे स्वप्न पाहिले आणि १९९८ मध्ये ही संस्था उभी केली. संस्थेची सुरुवात ही अत्यंत अल्प साधनांमध्ये, पण मोठ्या स्वप्नांसह झाली. अनेक अडचणी, आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करत करत आम्ही संस्थेचा पाया मजबूत केला आणि आज ही संस्था एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहचली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत या संस्थेच्या प्रगती साठी प्रयत्नशील राहणार आहे.'

या नवीन पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने संस्थेचे सर्व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, कॅम्पस इनचार्ज, उपप्राचार्या, सर्व अधिष्ठाता व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.