पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागातील राधीका चव्हाण हिची ॲप्टीव्ह काम्पोनंटस इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड

 पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागातील राधीका चव्हाण हिची ॲप्टीव्ह काम्पोनंटस इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड



वार्षिक ६ लाख पगाराचे पॅकेज


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्टीकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर, जि.सोलापूर येथील कु.राधीका उमेश चव्हाण हिची ॲप्टीव्ह काम्पोनंटस इंडिया प्रा. लि. कंपनीत निवड झाली असून तीला वार्षिक ६ लाख पॅकेज मिळाले असून १ जानेवारी २०२५ रोजी कंपनीमध्ये रुजू झाली असल्याची माहिती विदयुत अभियांत्रिकी विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शिवशंकर कोंडूरु यांनी दिली. 

ॲप्टीव्ह काम्पोनंटस इंडिया प्रा. लि. कंपनी ही आर्यलंड-अमेरिकन ॲटोमोटिव्ह तंत्रज्ञान, पुरवठादार बहूराष्टीय कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय स्विर्झलंड येथे असून भारतामध्ये तेरा हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीचे पुणे येथे कार्यालय असून ही कंपनी वाहतूक, अवकाश, संरक्षण, दूरसंचार आणि औदयोगिक बाजारपेठांना सेवा देणारी जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये विदयार्थ्यांसाठी प्लेसमेंटचे स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून विदयार्थ्यांना कंपनीत निवड होणेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची माहिती घेऊन प्लेसमेंटपूर्व संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. सिंहगड महाविदयालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच दर्जेदार बहूराष्टीय नामांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी महाविदयालय प्रयत्नशील आहे. कॅम्पस प्लेसमेंटमधून विदयार्थ्यांना मोठया कंपन्यामध्ये चांगल्या आकर्षक वेतनावर नोकरी मिळत असल्याने पालक व विदयार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

राधीका चव्हाण हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.