*फॅबटेक मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्र भेट*
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असणाऱ्या विविध कंपन्यांना भेट दिली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डाॅ. शरद पवार यांनी दिली.
फॅबटेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दिनांक २७ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत दोन दिवसीय औद्योगिक क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजी नगर मधील वाळुंज एमआयडीसी मध्ये असलेल्या मे. मनु इलेक्ट्रिकल्स या पीसीबी डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तसेच मे. सायडलर इलेक्ट्रॉनिक्स ह्या नामांकित ऑटोमेशन इंडस्ट्रीला भेट देण्यात आली.
याप्रसंगी सायडलर इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीचे जनरल मॅनेजर संदीप देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील कार्यप्रणालीची माहिती दिली. याशिवाय कंपनीच्या उत्पादनांचा वृत्तांत सांगितला.
याऔद्योगिक क्षेत्रभेट साठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील ३३ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही भेट यशस्वी करण्यासाठी विभागाचे शिक्षक डॉ. गणेश बिराजदार, प्रा. अक्षय रूपनर, प्रा. ऋषिकेश देशमुख, प्रा निलिमा बनाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही भेट फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद शेंडगे, उप प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

