*सांगोला फॅबटेक मध्ये "मंगोडीबी" या विषयावर व्याख्यान संपन्न*
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विभागात ३१ मे २०२५ रोजी "मंगोडीबी" या विषयावर संजीवनी कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे यांनी दिली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता साॅफ्टवेअर इंजिनिअर संजीवनी कदम यांचे विभागाच्या वतीने डाॅ. सोमनाथ ठिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळेस बोलताना साॅफ्टवेअर इंजिनिअर संजीवनी कदम म्हणाल्या, अभियांञिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आधुनिक डेटा बेसचा उपयोग करून विकसित केली पाहिजे. या कौशल्याच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. इंटरनेटचा अतिरिक्त होत असलेला वापर लक्षात घेता तयार झालेल्या डेटा योग्य पद्धतीने साठवण करणे हि काळाची गरज असल्याचे मत संजीवनी कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या कार्यशाळेत संजीवनी कदम यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मंगोडीबी डेटा बेस याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात ४५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वय प्रा. जयश्री मदने, डाॅ. मनोज पाटील, प्रा. विनायक साळे, प्रा. चैञाली धुमाळ, प्रा. गणेश हुंडेकरी, प्रा. प्रियांका गुजरे आदींसह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. जयश्री मदने यांनी केले.

