पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील स्वरुप संजयकुमार धोकटे यांची आय.आय.टी, मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश*

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील स्वरुप संजयकुमार धोकटे यांची आय.आय.टी, मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश*



एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये चतुर्थ वर्षातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची आय.आय.टी. मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी ( एम.टेक एनव्हायरमेंट इंजिनियरींग साठी ) प्रवेश मिळाला असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. 

नुकत्याच झालेल्या गेटच्या परिक्षेत स्वरुपने घवघवीत यश संपादन केले असून त्याने भारतामध्ये स्थापत्य विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांमधून 1096 क्रमांक पटकावला आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थ्यांना गेट परिक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थांना महाविद्यालयाकडून गेट टयूटोर हे स्वाप्टवेअर उपलब्ध करुन दिलेले आहे. महाविद्यालयातील शिक्षक वर्ग गेट परिक्षेच्या तयारीसाठी विशेष अध्यापन विदयार्थ्यांना करतात. त्याच्या या यशामागे स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रा.सिध्देश पवार यांनी खूप मेहनत घेतली. दरवर्षी पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विदयार्थी गेट परिक्षा उत्तीर्ण होत असतात.

त्याच्या या यशाबददल स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख श्रीगणेश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ.शाम कुलकर्णी, डॉ. समीर कटेकर, डॉ.शिवशंकर कोंडूरु, डॉ.अल्ताफ मुलाणी, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ.संपत देशमुख, डॉ.अनिल निकम, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.बाळासाहेब गंधारे, डॉ.अतुल आराध्ये, डॉ.सोमनाथ कोळी, डॉ.यशवंत पवार, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सत्यवान जगदाळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad