पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई* *जबरी चोरी करणारे तीन आरोपींना 12 तासात गजाआड केले*

 *पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई*


*जबरी चोरी करणारे तीन आरोपींना 12 तासात गजाआड केले*



*पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रोपळे या गावचे शिवारातील हॉटेल शिवशंभू मध्ये दि. 07/06/2025 रोजी रात्री 01:00 वाची सुमारास यातील फिर्यादी श्री उत्तम बाजीराव गोडगे रा माढा तालुका माढा व त्यांचे मित्र श्री धुमाळ हें गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबले असता त्या ठिकाणी तीन अज्ञात इसमांनी येऊन लोखंडी रोड व लाकडी दांडक्याच्या सहाय्याने फिर्यादी उत्तम गोडगे व धुमाळ यांना डोक्यात व पाठीत मारहाण करून जबर दुखापत करून जबरी चोरी केली होती त्यानंतर दिनांक 08/06/2025 रोजी मौजे रोपळे तालुका पंढरपूर आष्टी रोडवर रात्री 08:00 वाचे सुमारास फिर्यादी भैरवनाथ संजय नाडकर राहणार मुंगशी तालुका माढा हे रोडने जात असताना त्यांना चार अनोळखी इसमांनी रस्त्यामध्ये अडवून मारहाण करून जबर दुखापत करून त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल किंमत रुपये 75 हजार रुपयेची मोटर सायकल जबरदस्तीने चोरून घेऊन गेले. सदर दोन्ही घटनेबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे 489/25 व 491/25 BNS कलम 309 वगैरे प्रमाणे दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती मिळताच पंढरपूर  

 उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तपासाची वेगवेगळी तपास पथके तयार करून फिर्यादीने सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून गुन्ह्यातील आरोपींचा मौजे आष्टी ता मोहोळ या भागात शोध घेऊन सदर गुन्ह्याचे तपास कामी एकूण तीन आरोपींना1/ तुषार सुनील कोळेकर वय 23 वर्षे राहणार पंढरपूर सध्या आष्टी मोहोळ 2/सुरज देशमुख राहणार मोहोळ 3/ राहुल फाळके राहणार मोहोळ असे तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर आरोपींकडे सखोल तपास केला असता. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून आरोपीनी गुन्ह्यात चोरलेली रक्कम व मोटर सायकल किंमत रुपये 75 हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण 3 आरोपीना अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

 सदरची कारवाई 


माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सपोनि विश्वास पाटील पोसई कवितकर, सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले विजयकुमार गायकवाड पोलीस हवालदार स्वप्निल वाडदेकर, पोलीस हवालदार सज्जन भोसले, पोलीस हवालदार इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने,पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, विजयकुमार आवटी सुर्वे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर हसेन नदाफ यांच्या पथकाने केली आहे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad