*फॅबटेकच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात व्याख्यान*
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी प्रा. सचिन अनुसे यांचे "जावा एँपलेट" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आले होते.हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागात द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "जावा एँपलेट" या विषयावर आयोजित केले होते.
यामध्ये प्रा. सचिन अनुसे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजी चा उपयोग करून कौशल्य विकसित केले पाहिजे. याशिवाय कोडिंग, साॅफ्टवेअर कसे वापरायचे याची महत्वपूर्ण माहिती दिली.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे, प्रा. प्रियांका गुजरे आदींसह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जयश्री मदने यांनी केले.

