*फॅबटेकच्या विद्यार्थ्यांची विविध ठिकाणच्या कंपनीस भेट*
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील विद्यार्थ्यांची सांगली, कोल्हापूर व मालवण आदी ठिकाणी भेटी दिल्या असल्याची माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे यांनी दिली.
फॅबटेक काॅलेज मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी २१ व २२ मे २०२५ रोजी सांगली येथील इन्फोयशोनंद टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर येथील प्रोमैक्सिस प्रोग्रॅमिंग सोल्युशन प्राइवेट लिमिटेड आणि मालवण येथील सोफ्टलाॅब ग्रुप प्राइवेट लिमिटेड आदी ठिकाणी भेटी देऊन त्या कंपनीच्या उत्पादनाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
हि इंडस्ट्रील व्हिजिट यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश हुंडेकरी, प्रा. विनायक साळे, प्रा. चैञाली धुमाळ, प्रा. प्रियंका गुजरे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

