परस्पर सहकार्यातून प्रगती शक्य -अधिष्ठाता सीडीओ डॉ. अरुण तंगीराला स्वेरीच्या संशोधन विभागाला दिली आय.आय.टी., तिरुपतीच्या डॉ.अरुण तंगीराला यांनी सदिच्छा भेट


परस्पर सहकार्यातून प्रगती शक्य                                                                                                  

                                                -अधिष्ठाता सीडीओ डॉ. अरुण तंगीराला

स्वेरीच्या संशोधन विभागाला दिली आय.आय.टी., तिरुपतीच्या डॉ.अरुण तंगीराला यांनी सदिच्छा भेट



पंढरपूर- ‘स्वेरीचा कॅम्पस, शैक्षणिक उपक्रम व येथील कल्चर पाहता ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनाचे जाळे विणलेले पाहून विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील योगदान महत्वाचे ठरत असल्याचे जाणवते. परस्पर सहकार्यातून आणि समन्वयातून प्रगती शक्य होते. त्यामुळे संशोधनाच्या प्रगतीसाठी स्वेरी सोबत भविष्यात समन्वय साधून सहकार्य केले जाणार आहे.’ असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोजी, तिरुपतीचे अधिष्ठाता सीडीओ डॉ. अरुण तंगीराला यांनी केले. 

         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, तिरुपतीचे अधिष्ठाता सीडीओ डॉ. अरुण तंगीराला यांनी अलीकडेच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते गौरवोदगार काढत होते. संस्थेच्या वतीने त्यांचे प्रथम स्वागत करण्यात आले. ‘१९९८ साली स्वेरीने ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ पंढरीच्या पायथ्याशी अर्थात गोपाळपूरमध्ये रोवली त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडली असून अफाट परिश्रम घेत आज स्वेरीच्या बीजाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. स्वेरीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन या महत्वाच्या मुद्यांवर बोलत असताना आयआयटीचे योगदान कोणत्या स्वरुपात विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल यावर डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्यासमवेत अधिष्ठाता सीडीओ डॉ. अरुण तंगीराला यांनी चर्चा केली. त्यातील ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स ला भेट देऊन तेथील संशोधन व नवकल्पनांची पाहणी केली तसेच ड्रोन क्षेत्रातील प्रगती पाहून टीमच्या इनोव्हेशन कौशल्याचे विशेष कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पल्स च्या माध्यमातून तांत्रिक सत्रे, उद्योग संपर्क, करिअर मार्गदर्शन, तसेच संशोधन व इनोव्हेशन क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टीकोन मांडण्यात आला. डॉ. तंगीराला यांच्या संवाद व कॅम्पस भेटीदरम्यान संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवीन दृष्टिकोन समोर आले, ज्यामध्ये आयआयटी तिरुपती व आयआयटी एल्युमनी लीडरशिप सिरीज (पाल्स) या मंचासोबतच्या सहकार्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले. या समवेत डॉ. तंगीराला यांनी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासमवेत महाविद्यालयासोबतचे ऋणानुबंध कसे जपावेत याबद्धल चर्चा करून त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. स्वेरीचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जसजसे लक्षवेधी ठरत आहे तसतसे माळरानावरील या शैक्षणिक संकुलाला भेट देणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कॅम्पसला आय आय.टी., तिरुपतीचे डॉ. अरुण तंगीराला यांनी सदिच्छा भेट दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक प्रेरणेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व संशोधन अधिष्ठाता डॉ. अमरजित केने यांच्या परिश्रमामुळे संशोधन विभागाला गती मिळत आहे. कॅम्पसमध्ये संशोधन कल्चर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल देखील साहजिकच संशोधनाकडे अधिक असल्याचे विविध संशोधन प्रकल्प, संशोधनासाठी मिळालेला निधी, शिक्षण पद्धती, स्वेरीमधील इतर सुविधा या मधून जाणवते. त्या अनुषंगाने असलेले उपक्रम, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, नाईट स्टडी, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, गेट व स्पर्धा परीक्षेची तयारी, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील आदरयुक्त शिस्त व मिळत असलेले संस्कार, विविध शैक्षणिक, विधायक व सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी पब्लिसिटी प्रोटोकॉल विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी. एस. चौधरी व संशोधन विभागातील शिक्षक, ड्रोन प्रयोगशाळेचे कर्मचारी भाग्यश्री देशमुख, शिवभक्ती देशमुख, मारुती आसबे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.