राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान : अनुदानावर बियाणे, औषधे व खते
महा डीबीटी पोर्टलवर 29 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान अन्नधान्य पिके सन 2025-26 अंतर्गत सुधारीत तंत्रज्ञानावर अधारीत पिक प्रात्यक्षिके, आंतरपीक प्रात्यक्षिके, पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षिके घटकात तुर, मुग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा पिकांसाठी अनुदानावर बियाणे व निविष्ठा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती प्रवर्गातील सर्व शेतकरी गटांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि 29 मे 2025 पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
सलग पिक प्रात्यक्षिके (तुर, मुग, उडीद, ) अनुदानाचा दर उच्चतम मर्यादा रु. 9000 प्रती हेक्टर, सलग पिक प्रात्यक्षिके (बाजरी, मका) अनुदानाचा दर उच्चतम मर्यादा रु. 7500 प्रती हेक्टर, आंतरपिक प्रात्यक्षिके (तुर आंतरपिक सोयाबीन) अनुदानाचा दर उच्चतम मर्यादा रु. 9000 प्रती हेक्टर, पिक पध्दतीवर आधारीत पिक प्रात्यक्षिके (मुग नंतर ज्वारी, मुग नंतर गहू, उडीद नंतर ज्वारी, उडीद नंतर गहू, बाजरी नंतर हरभरा, सोयाबीन नंअतर गहू) अनुदानाचा दर उच्चतम मर्यादा रु. 15000 प्रती हेक्टर, समाविष्ट निविष्टा- सुधारीत बियाणे, बिजप्रक्रियेसाठी निविष्ठा, सुक्ष्म मुलद्रव्य, पिक संरक्षण औषधे, तणनाशके , प्रगतशील शेतकरी, तंज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन राहिल.
पिक प्रात्यक्षिक घटकासाठी पिक प्रात्यक्षिके ही बाब नोंदणीकृत शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था आदीव्दारे करण्यात येईल. पिक प्रात्यक्षीक घटकासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करताना नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था आदींची निवड प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्यद्वारे करण्यात येईल. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणी केलेला असावा. गटातील शेतक-यांना पीक प्रात्यक्षीकाचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅग वर नोंदणी असणे बंधनकारक आहे.एका कुटुंबातील (पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संबंअधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

