सांगोला फॅबटेक मध्ये "मुलभूत व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये" या विषयावर प्रशिक्षण*

 *सांगोला फॅबटेक मध्ये "मुलभूत व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये" या विषयावर प्रशिक्षण*



सांगोला: प्रतिनिधी 


फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये मंगळवार दिनांक १३ मे २९ मे २०२५ या कालावधीत सॉफ्ट स्किल्स (मुलभूत व्यक्तिमत्त्व विकास कौशल्ये) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.

  या प्रशिक्षणाची सुरुवात प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 या प्रशिक्षणात बोलताना कल्याण कुमार म्हणाले, उद्योग जगतातील बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या सॉफ्ट स्किल्स यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नोकरीच्या संधी मिळविताना आणि व्यावसायिक जगात टिकून राहण्यासाठी या कौशल्यांची गरज अधिक ठळकपणे जाणवते.

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रभावी संवादकौशल्य, व्याकरण सुधारणा, सादरीकरण तंत्र, शरीरभाषा व आशा संवाद, हावभाव, आत्मविश्वास वृद्धी, टीम वर्क, इंटरव्ह्यू कौशल्ये आणि वेळेचे नियोजन यांसारख्या विविध बाबींवर आधारित क्रियाशील प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांद्वारे आणि विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सरावाची संधी देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे.

   प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. भविष्यातील करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा निश्चितच मोठा फायदा होईल असा विश्वास या दरम्यान महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.

   हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, विभाग प्रमुख प्रा. ज्योती शिंदे यांच्यासह प्रथम वर्ष अभियांञिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad