पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी

अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर प्रतिनिधी 


       सोलापूर दिनांक 04 (जिमाका):- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात यासाठी पात्र लाभार्थीना 20 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल, नरळे यांनी केले आहे. 

      जिल्हा वार्षिक योजनेतून दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, वैरण व पशुखाद्य कार्यक्रम अंतर्गत 50 टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देऊन त्याअंतर्गत सायलेज बॅग खरेदी करणे तसेच खनिज मिश्रण वापरासाठी कमाल 02 दूधाळ पशुधनासाठी 33 टक्के अनुदान वाटप करण्यात येणार आहे   

          या योजनांसाठी पात्र लाभार्थीकडुन अर्ज मागविण्यात येत असून सदरचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती व सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.zpsolapur) उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख दिनांक 20 डिसेंबर 2024 आहे. 

 तरी इच्छुक पात्र लाभार्थीनी वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे अध्यक्ष, तथा अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल, नरळे यांनी यांनी केले आह

                                                              000000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad